Ad will apear here
Next
‘जीजीपीएस’मध्ये विद्यार्थ्यांकडून वैविध्यपूर्ण कवायतींचे सादरीकरण


रत्नागिरी :
रत्नागिरीतील श्रीमान गंगाधर गोविंद पटवर्धन इंग्रजी माध्यम शाळेतील (जीजीपीएस) विद्यार्थ्यांनी २७ डिसेंबर २०१९ रोजी वैविध्यपूर्ण शारीरिक कवायती उत्तम पद्धतीने सादर केल्या. शाळेतील प्रत्येक वर्गातील सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांच्या एकत्रित सहभागातून कवायतींचे विविध प्रकार सादर करण्यात आले. त्यात योगासने, पिरॅमिड, सूर्यनमस्कार, शास्त्रीय नृत्य, समूह गायन, डंबेल्स, घुंगूरकाठी, लेझीम, एरोबिक्स आणि झुंबाडान्स इत्यादी प्रकारांचे सुसूत्रपणे आणि देखणे सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले.



एमसीसी पथकाच्या शिस्तबद्ध संचलनाच्या सलामीने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे उद्घाटन माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी निशादेवी वाघमोडे यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पा पटवर्धन, संस्थेचे पदाधिकारी आनंद देसाई आणि सुदेश प्रसादे हे उपस्थित होते. 



‘आजच्या धावपळीच्या आणि व्यग्र जीवनशैलीत व्यायामाने मन व शरीर तंदुरुस्त राखणे अत्यंत गरजेचे आहे,’ असे प्रतिपादन निशादेवी वाघमोडे यांनी केले. विद्यार्थी आणि शिक्षकांच्या या विशेष प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले. शिक्षकांच्या सहभागाबदल त्यांनी समाधान व्यक्त केले. कार्याध्यक्षा शिल्पा पटवर्धन यांनी विद्यार्थी आणि पालकांच्या सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केले. विद्यार्थ्यांना त्यांनी मोलाचा सल्ला दिला. 



कार्यक्रमाच्या नियोजनासाठी मुख्याध्यापक प्रतापसिंह चव्हाण, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका विजया पवार आणि सर्व क्रीडाशिक्षकांनी परिश्रम घेतले. सर्व शिक्षकांच्या सहभागाने सादर झालेल्या या उपक्रमाचे संस्थेचे कार्यवाह सतीश शेवडे आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी कौतुक केले. 



 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/VZCQCH
Similar Posts
विद्यार्थ्यांच्या कलाकौशल्याला वाव देण्यासाठी ‘जीजीपीएस’मध्ये प्रदर्शनाचे आयोजन रत्नागिरी : रत्नागिरीतील श्रीमान गंगाधर गोविंद पटवर्धन इंग्रजी माध्यम शाळेत (जीजीपीएस) २८ फेब्रुवारी ते दोन मार्च २०२० या कालावधीत विद्यार्थ्यांनी कार्यानुभवातून बनविलेल्या वस्तू आणि चित्रांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे दिवंगत कार्याध्यक्ष अरुअप्पा जोशी यांच्या
‘जीजीपीएस’मध्ये भरली विद्यार्थी संसद! रत्नागिरी : रत्नागिरीतील श्रीमान गंगाधर गोविंद पटवर्धन इंग्रजी माध्यमाच्या शाळेत २९ फेब्रुवारी २०२० रोजी विद्यार्थी संसद आयोजित करण्यात आली होती. यामध्ये रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमिक शाळा आणि गुरुकुल प्रकल्पातील विद्यार्थी सहभागी झाले होते. या विद्यार्थी संसदेत ‘शिक्षण कशासाठी?’ आणि ‘स्त्री
‘जीजीपीएस’मध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमान गंगाधर गोविंद पटवर्धन इंग्रजी माध्यम शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप आणि शुभेच्छा देण्याचा समारंभ नुकताच पार पडला. जिल्हा पोलीस उपअधीक्षक श्री. खान आणि पोलिस निरीक्षक अनिल विभूते, तसेच अॅड. प्रिया लोवलेकर आणि रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या
‘जीजीपीएस’मध्ये विज्ञान प्रदर्शनाला प्रतिसाद; वैज्ञानिक पद्धतीने झाले उद्घाटन रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या जीजीपीएस या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत सात आणि आठ जानेवारीला विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन रत्नागिरी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी उत्तम भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. विज्ञानाचा आधार घेऊन या वेळी आधुनिक पद्धतीने दीपप्रज्ज्वलन करण्यात आले

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language